ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा, राज ठाकरेंचा जिल्हाध्यक्षांना आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणूका (Election) जाहिर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 15 जानेवारी 2021 रोजी राज्यातील सर्व ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congrss), भाजप (BJP) या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच आता मनसेने (MNS) उडी घेतली आहे. मनसेने देखील संपूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणुकांसाठी सज्ज व्हा. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी जाहीर केले आहे.

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होतील.

निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे – 15 डिसेंबर

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर

उमेदवारी अर्जाची छाननी – 31 डिसेंबर

उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप – 4 जानवेरी

मतदान – 15 जानेवारी (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30)

मतमोजणी – 18 जानेवारी

निवडणूक निकालाची अधिसुचना प्रसिद्धी – 21 जानेवारीपर्यंत