Ghinghru Fruit | अनेक औषधी गुणांचे भांडार हे दुर्मिळ फळ, केवळ ३ महिने मिळते बाजारात, ५ फायदे जाणून घेतल्यास शोधत राहाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुर्वेदात अशा अनेक झाडांचा आणि वनस्पतींचा उल्लेख आहे, ज्यांचा मोठ्या प्रमाणावर औषधी बनवण्यासाठी वापर केला जातो. घिंघारू (Ghinghru Fruit) देखील असेच एक चमत्कारिक फळ आहे. या फळांना हिमालयन रेडबेरी (Himalayan Redberry, फायरथॉर्न अ‍ॅप्पल (firethorn apple) किंवा व्हाईट थॉर्न असेही म्हणतात. तर त्याचे वानस्पतिक नाव पायराकॅन्था क्रेनुलॅटा (pyracantha crenulata आहे.

घिंघारू ही एक औषधी आणि बहुउद्देशीय वनस्पती आहे. तिच्या मुळापासून फळे, फुले, पाने आणि डहाळ्यांपर्यंत सर्व खूप फायदेशीर आहे. हे फळ फक्त जून, जुलै आणि ऑगस्टच्या आसपास तीन महिने उपलब्ध असते (Health benefits of Ghinghru fruit).

घिंघारूची फळे सुकवून त्याचे चूर्ण दह्यासोबत घेऊन रक्तयुक्त अतिसारावर उपचार केले जातात. या फळांमध्ये साखरेचे प्रमाणही पुरेसे असते, ज्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते. याच्या फांदीचा उपयोग दातून म्हणून केला जातो, ज्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो. घिंघारूचे आरोग्य फायदे जाणून घेऊया (Ghinghru Fruit)-

घिंघारू मध्ये भरपूर प्रोटीन

घिंघारूच्या छोट्या फळांचा गुच्छ असतो. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पिकल्यावर ती केशरी किंवा गडद लाल होतात. ही फळे चवीला सौम्य आंबट, तुरट आणि गोड असतात. घिंघारूमध्ये प्रोटीन भरपूर असतात. हे झाड मध्यम आकाराचे असते, फांद्या काटेरी तर पानांचा रंग गडद असतो. ही वनस्पती ५०० ते २७०० मीटर उंचीवर असलेल्या डोंगराळ भागात आढळते.

घिंघारूचे ५ चमत्कारी आरोग्य फायदे

डायबिटीजवर लाभदायक :

घिंघारूच्या फळांमध्ये आणि पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे ते हृदयविकार, उच्च रक्तदाब, डायबिटीज बरे करते.

रक्तयुक्त अतिसारात आराम :

घिंघारू हे फळ रक्तयुक्त अतिसार थांबवण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी घिंघारूची फळे सुकवून त्याची पावडर बनवून दह्यासोबत सेवन करा. यामुळे रक्तयुक्त अतिसारापासून आराम मिळेल.

दातदुखीवर फायदेशीर :

घिंघारूच्या झाडाच्या फांदीाचा वापर दातून म्हणून सर्वाधिक केला जातो. याने नियमित दात स्वच्छ केल्याने दातांमध्ये चमक येते, दातदुखीपासून आराम मिळतो.

कोलेस्ट्रॉल कमी करते :

घिंघारू औषधी फळ प्रोटीनचे उत्तम स्रोत आहे. घिंघारूचे औषधी गुणधर्म रक्तातील हानिकारक
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात.

हृदयातील रक्ताभिसरण सुधारते :

घिंघारूच्या फळामध्ये असलेले बायोफ्लेव्होनॉइड्स हृदयातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी प्रभावी आहे.
ते रक्तवाहिन्यांना नष्ट होण्यापासून वाचवते. मेंदूतील रक्त प्रवाह सुरळीत ठेवते. ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न