Gigi Hadid | प्रसिद्ध मॉडेल गिगी हदीद हिला पोलिसांनी केली अटक; कारण आले समोर

पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री गिगी हदीद (Gigi Hadid) ही सध्या प्रकाशझोतात आली आहे. गिगी ही नेहमी तिच्या फॅशनमुळे व विधानांमुळे चर्चेत असते. यावेळी मात्र गिगीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मॉडेल गिगीच्या बॅगमध्ये गांजा सापडल्याने तिला अटक करण्यात आली होती. आता मात्र गिगीची (Gigi Hadid) जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

प्रसिद्ध मॉडेल गिगी हदीद ही फॅशनवर्ल्ड मध्ये नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गिगीच्या बॅगमध्ये प्रवासादरम्यान ड्रग्स सापडले आहेत. पोलिसांकडून गांजा जप्त करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. गिगी आणि तिची मैत्रिण लिआह निकोल मॅककार्थी खासगी विमानाने प्रवास करत होते. गिगी आणि लिआहच्या बॅगची झडती घेण्यात आली. दरम्यान या दोघींच्या बॅगमध्ये गांजा सापडला. पोलिसांना आधीच गिगी आणि लिआह गांजा कॅमेन आयलँडमध्ये घेऊन जात असल्याची शंका होती. पोलिसांनी दोघींनी अटक केली व न्यायालयामध्ये हजर केले. तिथे दोघींना दोषी ठरविण्यात आले असून त्यांना 1000 डॉलर दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी गिगी हदीद (Gigi Hadid) ही नीता मुकेश अंबानी (Neeta Mukesh Ambani) कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतात आली होती. यावेळी तिची भारतामध्ये खूप चर्चा देखील झाली होती. सोहळ्यामध्ये डान्स करताना अभिनेता वरुण धवनने गिगीला (Varun Dhawan Kiss Gigi ) उचलून घेतले होते व किस केले होते. यावरुन वरुण धवनला ट्रोल करण्यात आले होते.

Web Title : Gigi Hadid | gigi hadid arrested in cayman islands for possession of marijuana Entertainment News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले- ‘सत्तेची साठमारी…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक

Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)