Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले- ‘सत्तेची साठमारी…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) तिसऱ्या दिवशी विधान भवन परिसरात ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले होते. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. यावेळी माध्यामांनी अजित पवारांच्या भेटीबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, मी अजित पवारांची भेट घेतली. त्यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी लोकशाही प्रेमी आणि देशप्रेमी पक्षांची बैठक (Opposition Parties Meeting) बंगळुरूत पार पडली. या पक्षांची एक आघाडी स्थापन झाली आहे. त्या आघाडीचं नाव INDIA असं आहे. मी जे दोन शब्द बोललो त्यात मी विशद केलं आहे की एका पक्षाविरोधात किंवा व्यक्ती विरोधात नाही. तर हुकूमशाहीच्या विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री या पदावर लोक येतात आणि जातात. मात्र जो पायंडा पडतो आहे तो घातक आहे. जे देशप्रेमी आणि लोकशाही प्रेमी लोक या विरोधात एकत्र आले आहेत, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

सत्तेची साठमारी चालली आहे त्यात…

सध्या जी काही सत्तेची साठमारी चालली आहे त्यात राज्यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. पाऊस सुरु झाला आहे, पूर स्थिती आहे. शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झाला होता, आता कदाचित अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) हवालदिल होईल. मात्र सत्तेची साठमारी सुरु आहे अशात जो मूळ आपला शेतकरी आहे, राज्याचा नागरिक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंती अजित पवार यांना केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे

तसेच अजित पवार हे अडीच वर्ष माझ्या बरोबर होते. मला खात्री आहे की सत्तेचे डावपेच इतर लोकांकडून सुरु असले तरीही अजित पवारांकडून जनतेला मदत होईल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे पुन्हा दिल्या आहेत त्यामुळे हे शक्य आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही

अजित पवारांबाबत सांगत शिवसेनेतून काही लोक बाहेर पडले होते. आता तेच त्यांच्यासह सत्तेत आहेत. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, हे सगळे जनतेला समजतं आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या वाक्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी केला. सरकार स्थापन झाल्यावर नांदा सौख्य भरे या शुभेच्छा दिल्या आहेत.

मी किळसवाणे व्हिडीओ बघत नाही

यावेळी उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर (Kirit Somaiya Viral Video Case) भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की,
मी असे किळसवाणे आणि विभत्स व्हिडीओ बघत नाही. परंतु त्यावर राज्यातील जनतेने खास करून माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला वाटत त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे.

अजित पवार शरद पवारांना दोन दिवस का भेटले? असा प्रश्न विचारला असता त्यावर आमची काहीही चर्चा झाली नाही असं उत्तरही उद्धव ठाकरेंनी दिलं.

Web Title :  Uddhav Thackeray | uddhav thackeray imp reaction after meeting with deputy cm ajit pawar what did he say

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा