Girish Mahajan | ‘भाजपात आलं की दुसरीकडं संसार करण्याची इच्छा होत नाही’ – गिरीश महाजन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपात आल्यानंतर दुसरीकडं संसार करण्याची इच्छा होत नाही, असे म्हणत भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला. चोपडा मतदार संघातील (Chopra constituency) अनेक शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टिकास्त्र सोडले.

गिरीश महाजन म्हणाले, एकदा भाजपमध्ये आलं की इतर कुठं संसार करण्याची इच्छाच होत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे स्थानिक पक्ष आहेत. शिवसेना आमच्यासोबत होती म्हणून त्यांचे 18 खासदार आणि 55 आमदार निवडून आले आहेत, असे महाजन यांनी सांगितले.

शिवसेनेला मोठा धक्का

जळगाव जिल्ह्यातील चोपडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, तिथल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुढाकार घेत हा पक्षप्रवेश घडवून आणल्याचं बोललं जात आहे.

हायड्रोजन बॉम्ब फुसका निघाला

नवाब मलिक हे पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब (Hydrogen bomb) फोडणार होते,
परंतु इतका फुसका जर हायड्रोजन बॉम्ब असेल तर हायड्रोजन बॉम्बचे नाव बदलावे लागेल,
असा टोला त्यांनी लगावला.
नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेले आरोप हे निव्वळ हवेत गोळीबार असून पुराव्याचा एक तरी कागद नवाब मलिक यांनी दाखवावा,
असे आव्हान महाजन यांनी दिले.

आता जनतेकडे लक्ष द्या

केवळ आपल्या स्वर्थासाठी मलिक नरर्थक आरोप करत असून आर्यन खान (Aryan Khan) किती चांगला व हर्बल तंबाखू किती छान हे सांगण्यापेक्षा मलिक यांनी आता जनतेकडे लक्ष द्यावे,
असेही महाजन यांनी म्हटले.

Web Title : Girish Mahajan | bjp leader girish mahajan criticizes shivsena and ncp in jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ तर पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज

ED Raid | नवाब मलिकांच्या मागे ED चा ससेमिरा? महाराष्ट्र वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी

Disha Parmar-Rahul Vaidya | अनोख्या अंदाजात दिशाचा वाढदिवस होतोय साजरा; पती राहुल वैद्यने शेअर केले दोघांचे रोमँटिक फोटो !