Girish Mahajan Meets Udayanraje Bhosale | उदयनराजे आणि गिरीश महाजनांची साताऱ्यात बंद दाराआड चर्चा, म्हणाले – ”महाराजांना तिकीट मागायची गरज नाही”

सातारा : Girish Mahajan Meets Udayanraje Bhosale | साताऱ्यातून लोकसभेसाठी (Satara Lok Sabha) उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. मात्र, भाजपाच्या दोन्ही उमेदवारी याद्यांमध्ये उदयनराजेंचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. परंतु, या नाराजीची दखल भाजपाने तातडीने घेतली आहे. आज भाजपा नेते गिरीश महाजन यांनी साताऱ्यात येऊन उदयनराजे यांची भेट घेतली. तसेच उमेदवारी जाहीर करण्यात कोणती अडचण आहे ते देखील सांगितले. यामुळे सध्यातरी उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, महाजन यांनी यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही भेट घेतली.(Girish Mahajan Meets Udayanraje Bhosale)

जलमंदिर पॅलेसमधील उदयनराजेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या वाटाघाटी सुरू आहेत. उदयनराजेंना तिकीट मागण्याची गरज नाही. त्यांचे तिकीट निश्चित आहे. त्यांचे तिकीट नाकारण्याचा विषयच येत नाही. त्याबाबत काही कोणाला सांगायची गरज नाही.

महाजन म्हणाले, भाजपा निवडणुकीच्या काळात आमचे सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी उदयनराजे यांचा राज्यभर
कसा उपयोग होईल, याबाबत चर्चा करण्यासाठी मी येथे आलो आहे.

महाजन म्हणाले, महाराजांचा नावलौकिक आहे. त्यांच्या नावाला एक वलय असल्याने जास्तीत जास्त प्रचारासाठी
त्यांचा कसा उपयोग होईल यावर चर्चा केली. आता फार वेळ राहिला नाही.
त्या काळामध्ये महाराज कुठे-कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्त फायदा कसा होईल हे पाहणार आहोत.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी आमदार शिवेंद्रराजे यांची देखील सुरुची पॅलेस येथे भेट घेतली.
यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर महाजन यांनी म्हटले की, आज दोन्ही राजेंची भेट घेऊन
सातारा लोकसभेचा आढावा घेतला. तसेच इतर सध्या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेची नेमकी काय परिस्थिती आहे, याविषयी जाणून घेतले, असे महाजन म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी