राष्ट्रवादीतील ‘मातब्बर’ दुपारी ‘शपथ’ घेतात अन् रात्री मला ‘कॉल’ करतात, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच ‘वक्‍तव्य’ !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप सेनेत पक्षांतर केले आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकाही केल्या आहेत. तसंच पक्षातील अनेक नेत्यांना आपल्यावरिल पक्षाचा विश्वास राहावा म्हणून ‘आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही’ अशा शपथा घ्याव्या लागतात. त्यावरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टीका करत मोठा खुलासा केला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.

‘आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही, अशा शपथ राष्ट्रवादीच्या नेत्यांना घ्यावी लागत आहे. आज अशी शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र राष्ट्रवादीतले अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

सध्या माझ्याकडे भाजप प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या ५० च्या वर लोकांची यादी आहे. माझा निम्मा दिवस ही यादी बघण्यातच जात आहे. या भाजप प्रवेश इच्छुकांच्या यादीत आजी-माजी आमदारांची नाव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच पत्रकारांनी मुख्यमंत्री होण्याबाबत विचारल्यावर त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये नाही, असं त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातील पावसावर आणि नाशिकमधील पूरस्थितीवरही प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये अतिवृष्टी सुरु असून प्रशासन सर्व काळजी घेत आहे. चांदोरी, सायखेडा तसेच काझीगडीवरील नागरिकांना स्थलांतरित केल्याचे सांगितले. तसंच पाऊस थांबला नाही आणि वेळ पडल्यास आम्ही मिल्ट्रीलाही तैनात करू, अशी माहिती महाजन यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –