मध्यरात्री मुलीच्या खोलीत गेले वडिल, दृश्य पाहून उडाली ‘भंबेरी’

सूरजगड ( राजस्थान) : वृत्तसंस्था – आजकाल समाजात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सूरजगड येथे एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी शेजाऱ्यांवर अत्याचार करून खून केल्याचा आरोप केला आहे.

पोलिस अधिकारी वीरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लोटिया गावातील बारावीत शिकणारी मुलगी काल रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करून झोपली होती आणि रात्री तीनच्या सुमारास जेव्हा वडिलांनी तिच्या खोलीत जाऊन पहिले तेव्हा ती तिच्या खोलीत त्यांना आढळली नाही. शोधाशोध केल्यानंतरही ती सापडली नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी येऊन सांगितले की मुलगी त्यांच्या घरात झोपली आहे. जेव्हा मुलीचे कुटुंब शेजारच्या घरी तिला पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तोंडात कापूस कोंबलेला आणि गळ्याला ओढणीने फास दिलेला अशा अवस्थेत मुलगी मिळाली.’

या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की मुलीवर आधी अत्याचार करण्यात आला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. पोलिसांना या घटनेविषयी माहिती देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी पोचल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्यापपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला नाही.

 

Visit : Policenama.com