फक्त 10 % आरक्षण द्या, JNU – जामियावर कायमचा ‘इलाज’ करतो, राजनाथ सिंह यांच्यासमोरच केंद्रीय मंत्र्याचं ‘बेताल’ वक्तव्य

लखनऊ : वृत्तसंस्था – जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून होत असलेला विरोध हा राजकारणातून होत आहे. जेएनयू आणि जामिया विद्यापीठात जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी मेरठ कॉलेजमध्ये आहेत. या विद्यार्थ्यांचा सीएएला पाठिंबा आहे. जर या विद्यापीठामध्ये 10 टक्के आरक्षण दिले तर जेएनयू आणि एएमयूचा इलाजच करू टाकू, अशी धमकी केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांनी त्यांच्याकडे पाहून हे वक्तव्य केले आहे.

पशूपालन, डेअरी आणि मस्त्य पालन राज्यमंत्री संजीव बलियान म्हणाले, पाकिस्तानमधून जे शरणार्थी भारतात आले. त्यापैकी आमच्याकडे आठ कुटुंब आहेत. सीएए मंजूर होण्याआधी मला देखील हे माहित नव्हते. मात्र, जेव्हा या कुटुंबाशी बोललो त्यावेळी समजले की ते पाकिस्तानमधून भारतात आले आहेत. या कुटुंबाच्या प्रमुखाने पाकिस्तानमध्ये हिंदूवर कशाप्रकारे अत्याचार केले जातात, त्यांच्या मुलींना जबरदस्तीने उचलून नेले जाते हे सांगितले.

उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, मोदी यांनी चांगले काम केले आहे. ते या लोकांना पटलेले नाही. भारताचे तुकडे तुकडे करणारे सुधारले तर देशासमोर कोणीही टीकू शकणार नाही. सीएएचा विरोध करणाऱ्यांच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्या प्रकारे त्यांनी उत्तरे दिली त्यावरून त्यांना काहीच माहिती नव्हती. षडयंत्र करून त्यांच्या हातात दगड दिले होते असे राणा यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –