काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या :  उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतली. तत्पूर्वी शिवसेना आमदारांशीही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली होती. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली. मागासवर्गीत आयोगाची वाट न पाहता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce3e36e1-93d9-11e8-953b-a10899a44390′]

माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालचं पाहिजे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. त्यासाठी आज शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले. तसेच मराठा समाजाने आक्रमकता सोडून द्यावी, तसेच कुठेही हिंसाचार करु नये असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले आहे.