मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण द्या : पुरुषोत्तम खेडेकर 

जामखेड : पोलीसनामा ऑनलाईन

नोकऱ्या उपलब्ध नसल्याने तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. मराठा आरक्षणाची लढाई ही शांततेच्या मार्गाने आपण लढणार आहोत. शासनाने सर्व मराठा समाजास कुणबी मराठा समजून सरसकट ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. जामखेड शहरात खेडेकर यांच्या उपस्थितीत मराठा जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी खेडेकर बोलत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e56e3012-cd0e-11e8-b15c-cb94f8de598f’]

खेडेकर म्हणाले, इंग्रज सरकारने केलेल्या नोंदीत मराठ्यांचा मराठवाडा वगळता सर्वत्र कुणबी असाच उल्लेख आहे. कुणबी ही जात ओबीसीमध्ये आहे. याचा फायदा अनेक मराठा नेत्यांनी राजकीय पदांसाठी केला आहे. सध्याच्या काळात शासकीय नोकऱ्या उपलब्ध नाहीत. मराठा तरुणांनी आवडेल ते काम करून समाजाचा विकास करणे हाच एकमेव उपाय आहे. प्रत्येकाने आपल्या घरात शिवाजी तयार करून त्याच्या पाठीमागे आई-वडिलांनी खंबीर उभे राहिले पाहिजे. तसेच विज्ञान युगामध्ये जगत असताना विज्ञानवादी झाले पाहिजे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. आई व पत्नीचा सल्ला घेतला पाहिजे, समाज्यातील एकमेकमधील तंटे सामोपचाराने मिटवले पाहिजेत. जिजाऊ श्रृष्टी आपले श्रद्धास्थान म्हणून निर्माण केले पाहिजे.

[amazon_link asins=’B00J2S4XM2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02f58bc6-cd0f-11e8-baf1-455018dc9cae’]

१४ जानेवारीला या श्रद्धास्थानाला भेट दिली पाहिजे. इतर समाजाविषयी वाईट न बोलता त्यांच्यातील आदर्श घेतला पाहिजे, असे खेडेकर म्हणाले. या वेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, मराठा सेवा संघाचे जामखेड तालुका अध्यक्ष राम निकम, डॉ. राजेंद्र पवार, अशोक शेळके, महाडीक, शहाजी वायकर, डॉ. सुहास सूर्यवंशी, आशिष पाटील, वाळेकर, खेंगरे, प्रा. शहाजी डोके, नारायण लहाने, हनुमंत निंबाळकर, बजरंग पवार, अवधूत पवार, संभाजी ढोले, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, दिगंबर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

#metoo : लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट अमिरने सोडला