सचिन तेंडुलकरची लेक साराच्या सौंदर्यापुढं बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सध्या चर्चेत आली आहे. सारा असं तिचं नाव आहे. आपल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. साराच्या सौंदर्याची आणि ग्लॅमरस लुकची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

साराचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला वाटू शकतं की, आपण एखाद्या अभिनेत्रीला पहात आहोत. परंतु ही अभिनेत्री नसून सारा आहे. साराच्या ग्लॅमरस लुकचे कारण म्हणजे तिची फॅशन. फॅशनच्या बाबतीत ती खूपच जागरूक आहे.

साराबद्दल सांगायचे झाले तर तिचा जन्म 12 ऑक्टोबर1997 साली झाला आहे. तिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. आपल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

साराच्या नावामागेही स्टोरी आहे. अनेकांना याबाबत माहिती नसेल. भारताने एकदा सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली सहारा कप जिंकला होता. त्यानुसार तिचे नाव सारा ठेवण्यात आले आहे.

आपली आई अंजलीची ती खूप लाडकी आहे. लंडनच्या विद्यापीठातून साराने डिग्री घेतली आहे. नेटकऱ्यांकडून साराच्या सुंदर फोटोंचं कौतुक होताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

 

Visit : Policenama.com