Coronavirus Medicine : संक्रमणाच्या सुरूवातीलाच होऊ शकणार ‘कोरोना’वर उपचार, ग्नेलमार्क फार्मानं बनवलं औषध, 103 रूपयांच्या गोळीनं रूग्ण होणार बरे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी औषध शोधून काढले आहे. शनिवारी कंपनीने एका निवेदनात ही माहिती दिली. ग्लेनमार्कने शनिवारी सांगितले की, त्याने व्हायरसच्या सौम्य आणि कमी लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी फॅबीफ्लू ब्रँड नावाने अँटीव्हायरल औषध फेव्हीपीरवीर लाँच केली आहे. मुंबईच्या कंपनीने शुक्रवारी सांगितले की, या औषधाचे उत्पादन व मार्केटिंग करण्यास भारतीय औषध नियंत्रक जनरल (डीजीसीआय) कडून मान्यता मिळाली आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोविड-19 वर उपचार करणार्‍या फॅबीफ्लू हे पहिले खाणारे फेविपिराविर औषध आहे, ज्यास मान्यता देण्यात आली आहे.

ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ग्लेन साल्दाना म्हणाले की, “ही मंजुरी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहेत. यामुळे आपली आरोग्य यंत्रणा मोठ्या दबावाखाली आली आहे. फॅबीफ्लूसारख्या प्रभावी उपचारांच्या उपलब्धतेमुळे हा दबाव मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

साल्दाना म्हणाले की, क्लिनिकल चाचण्यांमध्ये फॅबिफ्लूने कोरोना विषाणूच्या सौम्य संक्रमणाने ग्रस्त रूग्णांवर बरेच चांगले परिणाम दर्शविले आहेत. या व्यतिरिक्त ही एक खाणारी गोळी आहे, जे उपचारांचा सोयीस्कर पर्याय आहे. हे औषध देशभरातील रुग्णांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी कंपनी सरकार आणि वैद्यकीय समुदायाशी जवळून काम करेल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध प्रति टॅबलेट 103 रुपये किंमतीवर उपलब्ध असेल. पहिल्या दिवशी, 1800 मिलीग्रामचे दोन डोस घ्यावे लागतील. त्यानंतर, 800 मिलीग्रामचे दोन डोस 14 दिवसांसाठी घ्यावे लागतील. ग्लेनमार्क फार्मा यांनी सांगितले की मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांनाही हे औषध दिले जाऊ शकते.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी देशात कोरोना विषाणू बांधतांची संख्या 14,516 वर पोहोचली आहे. आता देशात या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून 3,95,048 झाली आहे. या साथीने देशात आतापर्यंत 12,948 लोकांचा बळी गेला आहे.