Coronavirus : जगभरात ‘कोरोना’मुळे 8 लाख लोकांचा मृत्यू, संक्रमितांचा आकडा 2 कोटींच्या पुढे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एएफपीच्या आकड्यांनुसार जगभरात कोविड-19 मुळे आतापर्यंत 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, संक्रमितांची संख्या 2 कोटींच्या पुढे गेली आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत 23,149,731 लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत आणि यामुळे 8 लाख 03 हजार 807 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 57 लाख, 32 हजार 515 रूग्ण कोरानातून बरे झाले आहेत.

कोरोना संक्रमितांच्या प्रकरणात अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसर्‍या आणि भारत तिसर्‍या स्थानावर आहे. तर कोरोना मृत्यूंच्या बाबतीत अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसर्‍या, आणि मेक्सिको तिसर्‍या स्थानावर आहे. तर भारत चौथ्या नंबरवर आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या विज्ञान आणि इंजिनियरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी आकड्यांनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 5521303 लोक संक्रमित झाले आहेत आणि 175350 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 3532330 लाख लोक संक्रमित तर 113318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात रूग्ण संख्या 30 लाखांच्या जवळ

केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात 69878 संसर्गाची प्रकरणे समोर आल्याने एकुण संक्रमितांची संख्या 2975701 झाली आहे. तसेच 945 लोकांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या 55,794 वर पोहचली आहे. देशात बरे होणार्‍या लोकांची संख्या 2222577 झाली आहे. कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केस सतत वाढत आता 6,97,330 वर पोहचल्या आहेत.