Gold-Silver Rate Today : 3 दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, तर चांदी महागली ! जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बुधवारी भारतीय बाजारात 3 दिवसांनंतर सोन्याच्या दरात (Gold Rate) किरकोळ घसरण दिसून आली. तर चांदीच्या किंमतीत (Silver Rate) वाढ झाल्याचं दिसून आलं. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या माहितीनुसार 30 डिसेंबर 2020 रोजी सोनं 16 रुपये प्रति तोळ्यानं घसरलं तर चांदी 205 रुपयांनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे जर वाढले आहेत.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 30 December 2020)

सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याचं दिसून आलं. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या माहितीनुसार 16 रुपये प्रति तोळ्यानं घसरून 99.9 शुद्धतेचं सोनं 49,484 रुपये झालं. आधीच्या 3 सत्रांमध्ये सोन्याचे दर वाढते होते. ते 49500 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1879 डॉलर प्रतिऔंस आहे.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 30 December 2020)

आज चांदीच्या दरात मात्र वाढ पहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदी 205 रुपयांनी वाढून 67,673 रुपये प्रतिकिलो झाली. आधीच्या सत्रात म्हणजेच मंगळवारी चांदी 67,468 रुपये किलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 26.22 डॉलर प्रतिऔंसवर आहे.