दागिने सोडून भारतीय खरेदी करतायेत ‘हे’ नव्या जमान्यातील सोनं, तुम्ही देखील घ्या फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या महिन्यात भारतीयांनी सोन्याचे दागिने सोडून गोल्ड ईटीएफ मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात १४५ करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. तब्बल ९ महिन्यानंतर प्रथमच गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक केली गेली असल्याचे दिसून आले आहे. रुपया कमजोर होऊन वाढलेल्या सोन्याच्या किमती दरम्यान गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक वाढली आहे. यात मासिक वाढीसोबतच वार्षिक वाढ सुद्धा दिसून आली आहे.

गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक वाढली
वर्षभरात ईटीएफ मध्ये ४७४ करोड रुपयांची गुंतवणूक केली गेली होती. जुले महिन्यात गोल्ड ईटीएफ मधून १७.६६ करोड रुपये काढले गेले होते. तर ऑगस्ट २०१८ मध्ये ४५ करोड रुपये काढले गेले होते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एएमएफआय) च्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये १४५.२९ करोड रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून गोल्ड ईटीएफ मधील गुंतवणूक बंद झाली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये ० कोटींची गुंतवणूक झाली होती.

सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढत आहे गुंतवणूक
यापूर्वी गोल्ड ईटीएफने ऑक्टोबर २०१६ मध्ये २० कोटी आणि मे २०१३ मध्ये ५ करोड रुपयांची गुंतवणूक केली होती. नवीन गुंतवणूकीमुळे ऑगस्टच्या अखेरीस गोल्ड ईटीएफच्या व्यवस्थापनातील मालमत्ता ५७९९ करोड रुपये होती. जुलै अखेर ते ५०८० करोड रुपये होते. मॉर्निंगस्टार इंडियाचे रिसर्च मॅनेजर-डायरेक्टर कौस्तुभ बेलापूरकर म्हणाले की, अनेक महिन्यांत ही पहिलीच वेळ आहे जे की, लोक मोठ्या प्रमाणावर गोल्ड ईटीएफ खरेदी करताना दिसले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ आणि रुपया कमकुवत होणे हे एक कारण मानले जात आहे. तामुळेच गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले आहे. या बाबतचे जाणकार सांगतात की, देशात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या ईटीएफ मध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत.

आरोग्यनामा ऑनलाइन –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like