सोने खरेदीत फसवणूक आता अशक्य, लवकरच केंद्र सरकारचा नवा नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोने- चांदीची शुध्दता मोजण्याचे काही माफन नाही. त्यामुळे अनेकवेळा सोन्यासारख्या मौल्यवान धातूत ग्राहकांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता असते. पण आता सोने खरेदीत फसवणूक करणे अशक्य आहे. केंद्र सरकार पुढच्या वर्षापासून एक नियम लागू करणार आहे. ज्यामुळे तुम्हाला 100 टक्के शुध्द सोने (gold) मिळणार आहे.

1 जुलै 2021 पासून नियम लागू
सोन्याच्या आभूषणांवर हॉलमार्किंग 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहे. आधी हा नियम 15 जानेवारी 2021 पासून लागू होणार होता. पण ज्वेलर्सनी BIS अंतर्गत एका वेळेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक होते, पण ते झाले नाही. सरकारने डेडलाईन वाढवावी अशी मागणी ज्वेलर्सनी केली. इतक्या कमी वेळात स्टॉक लिक्विडेट करणे सोपे नव्हते. यासाठी साधारण एक वर्षांच्या कालावधीची गरज असल्याचे ज्वलर्स म्हणणे होते. नव्या नियमांनुसार 22 कॅरेटचे सोने सांगून 18 कॅरेटचे सोने विकणाऱ्या ज्वेलर्सना दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. देशात हॉलमार्कींग केंद्राची संख्या वेळेनुसार वाढवली जाणार आहे. या वेळेस देशात 900 च्या आसपास हॉलमार्कींग केंद्र आहेत, जे आणखी वाढवले जाणार आहेत.