Gold Rate on 19 June : सोन्याच्या किमतीने गाठला ‘उच्चांक’, चांदीही ‘चमकली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सोन्या-चांदीच्या स्पॉटच्या किंमतीत शुक्रवारी वाढ नोंदविली गेली. शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोन्याचे भाव 144 रुपयांनी वाढले. यासह दिल्लीत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,334 रुपयांवर गेली. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्यात वाढ झाली आहे. मागील सत्रात गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,190 रुपयांवर बंद झाले होते. तसेच शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किंमतीतही स्थानिक सराफा बाजारात वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीची किंमत 150 रुपयांनी वाढली. चांदीची किंमत प्रति किलो 49,160 रुपये झाली. याआधीच्या सत्रात चांदी 49,010 रुपयांवर बंद झाली.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी सांगितले की, शुक्रवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे भाव 144 रुपयांच्या वाढीसह ट्रेंड करत होते. पटेल म्हणाले की, रुपयाची घसरण झाल्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली. शुक्रवारी एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 6 पैशांनी घसरून 76.20 वर ट्रेंड करीत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेविषयी बोलायचे झाल्यास, शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति औंस 1,729 आणि चांदीचा भाव 17.49 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. त्याच वेळी, स्थानिक वायदे बाजरात शुक्रवारी संध्याकाळी सोन्या-चांदीचे दोन्हींचे भाव वधारले. 5 ऑगस्ट 2020 रोजी शुक्रवारी संध्याकाळी एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 0.36 टक्के म्हणजेच 170 रुपयांनी वाढून 47,525 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. दरम्यान, तीन जुलै रोजी चांदीचा भाव यावेळी 1.10 टक्के म्हणजेच 528 रुपयांच्या वाढीसह 48,389 रुपये प्रति किलोग्रामवर ट्रेंड करत होती.