Gold Rate : मागील आठवड्याच्या तुलनेत सोने वाढले की घसरले ? जाणून घ्या बाजारभाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना (Corona) विरुद्धची लस येण्यापूर्वी काही काळ कमी झालेले सोन्याचे भाव (Gold Rate) पुन्हा वाढू लागले आहेत. अमेरिका, ब्रिटनसह चार-पाच देशांमध्ये कोरोना लसीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे. भारतातही कोरोनाच्या लसीला लवकरच मंजूरी दिली जाणार आहे. याच घडामोडीवर आठव्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली नाही.

आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली नसली तरी शुक्रवारी वायदा बाजारात फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे सोने 213 रुपयांनी वाढले. गुरुवारी हे सोने प्रति तोळा 49077 रुपयांवर बंद झाले होते. तर शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने 49290 वर बंद झाले आहे. याचप्रकारे एप्रिलच्या डिलव्हरीचे सोने 177 रुपयांनी वाढून 49330 रुपयांवर बंद झाले. मार्च डिलिव्हरीची चांदी देखील 70 रुपयांच्या वाढीने 63600 रुपये प्रति किलो दरावर बंद झाली.

दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोने 102 रुपयांच्या घसरणीमुळे 48 हजार 594 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात हे सोने 48 हजार 696 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. गेल्या आठवड्याचा दर पाहता या आठवड्यात सोने 102 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी गेल्या आठवड्यापेक्षा फक्त 6 रुपयांनी घसरली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी क्रमश:1836 डॉलर प्रति औंस आणि 23.92 डॉलर प्रति औंसवर राहिली आहे. ऑगस्टमध्ये सोने 56 हजार 379 रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याने कच खाल्ली. या दराची तुलना शुक्रवारच्या दराशी केल्यास सोन्याचे दर 6964 रुपयांची घसरण झाली आहे. याचप्रकारे ऑगस्टमध्ये चांदी 76 हजार 8 रुपये प्रति किलो झाली. शुक्रवारच्या दराशी तुलना केल्यास 12 हजार 408 रुपयांनी चांदी कमी झाली आहे.