Gold Price | स्वस्त सोने खरेदी करायचे असेल तर लकवर करा ! 2000 रुपयांपर्यंत वाढणार आहेत सोन्याचे दर, का येणार उसळी? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याचे भाव (Gold Price) जवळपास दोन महिने स्थिर राहिल्यानंतर आता वेगाने वाढणार आहेत. तुम्हालाही स्वस्तात सोने घ्यायचे असेल तर ते लवकर घ्या, कारण सोन्याच्या आयातीवरील शुल्क वाढल्यानंतर आता त्याचा परिणाम सराफा बाजारातही दिसून येणार आहे. (Gold Price)

 

1 जुलैपासून सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 10.75 टक्के वाढवून 15 टक्के केले आहे. तसे पाहता हे पाऊल रुपयाची घसरण आणि चालू खात्यातील वाढती तूट (CAD) थांबवण्यासाठी उचलण्यात आले आहे.

 

मे महिन्यात सोन्याची आयात 23 अब्ज डॉलरवर पोहोचली, त्यामुळे रुपयावर दबाव वाढत असून 1 जुलै रोजी तो डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. नवीन आयात शुल्क 30 जूनपासून लागू झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारत आपल्या गरजांसाठी पूर्णपणे सोन्याच्या आयातीवर अवलंबून आहे. आयात शुल्कात वाढ झाल्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही होणार आहे. (Gold Price)

 

आणि लवकरच त्याच्या किमती 2,000 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढू शकतात. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या लोकांसाठी आता सोने खरेदी करणे अधिक महाग होणार असून त्याचाही मागणीवर परिणाम होणार आहे.

 

18.45 टक्के झाला एकूण टॅक्स
सोन्यावरील आयात शुल्कात वाढ झाल्याने त्यावरील एकूण कर 18.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. वास्तविक, आतापर्यंत सोन्यावरील मूळ आयात शुल्क 7.5 टक्के होते, ते 5 टक्क्यांनी वाढवून 12.5 टक्के करण्यात आले आहे.

 

याव्यतिरिक्त, 2.5 टक्के अ‍ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस देखील लागू केला जातो, ज्यामुळे प्रभावी सीमा शुल्क 15 टक्के होते. यामध्ये, 0.45 टक्के निव्वळ शुल्क आकारले जाते, याशिवाय सोन्यावर 3 टक्के जीएसटी देखील लावला जातो, ज्यामुळे त्याचा एकूण कर 18.45 टक्के होतो.

मे महिन्यात दीड पटीने वाढली आयात
मे महिन्यात देशातील सोन्याच्या आयातीत दीड पटीने वाढ झाली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, मे महिन्यात सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 56 टक्क्यांनी वाढली,
तर त्यावरचा खर्च 677 टक्क्यांनी वाढून 5.83 अब्ज डॉलर झाला.

 

यामुळेच एमसीएक्सवर सोन्याचा भाव 2.50 टक्क्यांनी वाढताना दिसत होता, तर जागतिक बाजारात ते 1800 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आले होते.

 

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात एकूण 107 टन सोने आयात करण्यात आले होते,
जे जूनमध्येही झपाट्याने वाढत आहे. अधिक आयातीमुळे चालू खात्यातील तुटीवर ताण पडत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात ते जीडीपीच्या 1.2 टक्के होते, जे चालू आर्थिक वर्षात जीडीपीच्या 2.9 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

 

Web Title :- Gold Price | gold prices may rise by rupees 2000 per 10 gm as govt hikes import duty

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

 

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम