Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात (Pune News) आलेय. हा उपक्रम मागील दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन (The Poona Blind Men’s Association) आणि सेवा सहयोग संस्थातर्फे (Seva Sahyog Sanstha) संयुक्तपणे हा उपक्रम राबवित आहेत. शुक्रवारी झालेल्या या उपक्रमात अनेक दृष्टीबाधित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता.

 

द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन (PBMA) आणि सेवा सहयोग या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत. यांच्यातर्फे अनेक उपक्रम राबविले जातेय. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश शहा (Rajesh Shah), कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया (Pervez Bilimoria), काश्मिरा ठाकर (Kashmira Thacker) तसेच सेवा सहयोग संस्थेचे प्रतिनिधी प्रियंका पाटील (Priyanka Patil), चिन्मय खरे (Chinmay Khare), तनिष्का पटवर्धन (Tanishka Patwardhan) यांच्यासोबत दृष्टीबाधित पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. (Pune News)

 

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील 100 दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य कीट चे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक कीट मध्ये शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके, फुलस्केप वह्या, कंपॉस बॉक्स, टिफीन बॉक्स, व स्कूल बॅग इत्यादी साहित्याचा समावेश आहे. सहभाग घेतलेल्या दृष्टीबाधित व्यक्ती आणि विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतामध्ये दोन्ही संस्थांचे आभार मानले.

दरम्यान,द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था गेली 1952 पासून दृष्टीबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करीत आहे. दृष्टीबाधित व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टीबाधित निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम, 18 ते 35 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर, डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्ययावत एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल इत्यादी विविध प्रकल्प संस्थेमार्फत राबविले जात आहेत. महाराष्ट्र तसेच भारतामधील अनेक दृष्टिहीन व्यक्ती संस्थेच्या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत.

 

Web Title :- Pune News | Distribution of free educational materials to visually impaired children; An initiative of ‘The Poona Blind Men’s Association’ and ‘Seva Sahyog Sanstha’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2 तरुणावर काळाचा घाला

 

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

 

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…