पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | राज्यात सर्वत्र पावसाची (Maharashtra Rains) परिस्थिती निर्माण झाली असली तरी काही ठिकाणी म्हणावं तसा पाऊस पडला नाही. पुण्यातही पावसाने Pune (Monsoon) कमी अधिक प्रमाण घेतले आहे. याठिकाणी गेली दोन दिवस पावसाची रिपरिप दिसून आली (Pune Rains). 7 जुलैपर्यंत पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांची प्रतिक्षा संपणार आहे.
भारतीय हवामान विभागाचे (Indian Meteorological Department-IMD) प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांच्या माहितीनुसार, 6 जुलैपासून आगामी काही दिवसांपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपासून, कमकुवत मान्सूनच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 5 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होईल. पुन्हा 6 जुलैपासून काही दिवस मान्सून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Rains)
काही दिवसांपुर्वी पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. पुणे ग्रामीण भागातील (Pune Rural Area) शेतकरी देखील पेरणीसाठी पावसाची वाट पाहात आहेत. त्यामुळे पावसाकडे प्रत्येक पुणेकरांचे डोळे लागले आहेत. शेतकरी राजा देखील पावसाची आतुरतेनं वाट बघत आहे. दोन दिवस शहरात रिमझिम पावसाच्या सरी दिसून आल्या. मात्र पेरणीसाठी जसा पाऊस लागतो तशा पावसाने अजूनही हजेरी लावली नाही. त्यामुळे पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत होते. आता ती प्रतिक्षा येत्या 7 जुलैपासून संपणार आहे.
मुंबईत जोर’धार’ –
दरम्यान, मुंबई, मुंबई उपनगरांसह कोकणामध्ये आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता.
यानंतर आगामी 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
Web Title :- Maharashtra Rains | rain in maharashtra imd predicts light to moderate rains in pune till july 7
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update