रेकॉर्डब्रेक ! सोन्याच्या दराची ‘उच्चांकी’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ibja हे देशभरातील केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शवतं. 2011 मध्ये स्पॉट मार्केटमध्ये चांदीच्या किंमतीत प्रति किलो 77 हजार रुपयाची वाढ झाली. 16 मार्च 2020 रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 38 हजार 400 रुपये होती. त्यानंतर सोन्यामध्ये जवळपास 40 टक्के वाढ झाली असल्याची माहिती दिल्लीचे मीडिया प्रभारी राजेश खोसला यांनी दिली.

यामुळे वाढल्या किंमती
केडिया कमोडिटीजचे संचालक अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटामुळे सोन्या-चांदीचे भाव कमी होण्याऐवजी वाढत आहेत. शेअर बाजाराच्या या अनिश्चिततेमुळे रिअल इस्टेवरही परिणाम झाला आहे. यामुळे गुंतवणूकदार आता सोनं, गोल्ड ईटीएफ आणि बॉंडच्या दिशेने वळले आहेत. अशात सोन्याचे दर वाढत आहेत. दुसरीकडे, कोरोनाच्या संक्रमणामुळे खाणींच्या किंमतीवर परिणाम होत आहे. याचा परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, सध्या चांदीचे दरही जास्त असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यवसांमध्ये आणि अनेक मुद्यावर तणाव वाढला आहे.

यावर्षी 35 टक्क्यांनी महागले सोने
यावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे स्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार सोन्या-चांदीमध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. सोन्या – चांदीमध्ये सुरक्षित गुंतवणूक असल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्या-चांदीकडे आहे. त्यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होताना पहायला मिळत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like