Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्यात झाली घसरण, मिळतंय 9000 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली आहे. भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 26 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) किरकोळ घट नोंदली गेली आहे, परंतु सोने आपल्या सर्वोच्च दराच्या तुलनेत 9 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त मिळत आहे. चांदीच्या दरात (Silver) आज घसरण नोंदली गेली आहे.

 

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 64,740 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात घट झाली, तर चांदीचा दर स्थिर होता.

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 5 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ घट नोंदली गेली. यामुळे दिल्लीत 99.9 शुद्धतेच्या सोन्याचा दर 47,153 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)
चांदीच्या किमतीत आज घट दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 287 रुपयांनी कमी होऊन 64,453 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही आणि तो 24.30 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

सोने 9,047 रुपयांनी स्वस्त
सणासुदीच्या काळात धनत्रयोदशीपूर्वी सराफा बाजारात सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 9,047 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या किमतीत घट नोंदली गेली आणि ते 1,802 डॉलर प्रति औंसवर पोहचले. (Gold Price Today)

 

Web Title :- Gold Price Today | gold price today declines 9047 rupees lower then record high check updated gold silver rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची खास भेट ! ऑक्टोबरच्या पगारात मिळणार ‘हे’ 3 भत्ते, जाणून घ्या किती मिळेल पगार

MLA Shivendra Raje Bhosale | आमदार शिवेंद्रराजे यांचा टोला; म्हणाले – ‘साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे’ (व्हिडीओ)

Devendra Fadnavis | ड्रग्ज प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले – ‘…तर साक्षीदारांची विश्वासहार्यता संपुष्टात येईल’