Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | आज मंगळवारी सोने (Gold) आणि चांदी (Silver) च्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Price Today) आज 437 रुपयांनी घसरून 51,151 वर पोहचली. मागील व्यवहाराच्या सत्रात ती 51,588 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती.

 

चांदीची किंमत (Silver Price Today)आज 722 रुपयांनी घसरून 67,515 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर पोहचली आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीत झालेली घसरण आणि रुपयात झालेली वाढ याचे मुख्य कारण आहे.

 

सोन्याच्या किंमतीत लागोपाठ चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. मंगळवारी रुपया 36 पैशांची मजूबती आणि डॉलरच्या तुलनेत 75.80 वर पोहचला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी म्हटले की, आज कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड 0.25 टक्के घसरणीसह 1,918 डॉलर प्रति औंसच्या खाली व्यवहार करत होते, तर चांदी 24.80 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होती.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today declines rs 437 silver price tumbles rs 722 in delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Madhuri Misal | खाजगी सोसायट्यांमध्ये शासन आणि महापालिकेच्या निधीतून कामे करण्यास परवानगी मिळावी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार माधुरी मिसाळांनी केली मागणी (Video)

 

Pune Water Supply | प्रभात रस्ता परिसरातील 60 वर्षे जुनी ‘खापरा’ची पाईपलाईन फुटली होती; पाणी पुरवठा विभागाच्या हेल्पलाईनवर पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊस

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघ, एमईएस इलेव्हन संघांचे सलग विजय