Pune Water Supply | प्रभात रस्ता परिसरातील 60 वर्षे जुनी ‘खापरा’ची पाईपलाईन फुटली होती; पाणी पुरवठा विभागाच्या हेल्पलाईनवर पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | प्रभात रस्त्यावरील (Prabhat Road, Pune) कमी दाबाने होणार्‍या पाणी…
Pune Water Supply The 60 year old pmc water pipeline in the Prabhat Road area had burst Rain of complaints on the first day on the helpline of the water supply department
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | प्रभात रस्त्यावरील (Prabhat Road, Pune) कमी दाबाने होणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत आणखी एक नवीन कारण समोर आले आहे. सुमारे ५० ते ६० वर्षांपुर्वी याठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली ‘खापराची’ (मातीची) पाईपलाईनही फुटल्याने (PMC Water Pipeline Burst) कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. घोडके चौकात फुटलेली ही पाईपलाईनही दुरूस्त करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, महापालिकेने (Pune Corporation) पाणी पुरवठ्याशी संबधित हेल्पलाईन सुरू केल्यानंतर आज पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक तक्रारींची नोंद झाली आहे. (Pune Water Supply)

 

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने वातावरण तापले आहे.
महापालिकेनेही चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देतानाच येणार्‍या तक्रारींनुसार दुरूस्त्या करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासुन प्रभात रस्ता व डेक्कन परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.
स्थानीक लोकप्रतिनिधींनी यासाठी आंदोलने आणि निवेदनेही दिली.
मात्र, नेमके कशामुळे अडचणी येत आहेत, हे समजत नव्हते. दरम्यान दोनच दिवसांपुर्वी नळ स्टॉप चौकातील महामेट्रोच्या माध्यमातून उभारलेल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम करताना मुख्य वाहीनी फुटून पाणी पावसाळी गटारात वाहून जात असल्याचे समोर आले.
महापालिकेने तातडीने हे दुरूस्ती केल्यानंतर पाण्याचा दाब वाढला आहे. (Pune Water Supply)

तसेच पाईपलाईनमध्ये हवेचा दाब निर्माण होत असल्यानेही अडथळे येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कर्वे रस्त्यावरील घोडके चौकामधील वॉल्व्हचे काम हाती घेण्यात आले.
त्यावेळी तेथून प्रभात रस्त्याकडे जाणारी एक वाहीनी ही खापराची असून ती फुटल्यानेही पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले.
ही वाहीनी सुमारे ५० ते ६० वर्षांपुर्वीची आहे.
प्रशासनाने या वाहीनीचा भाग बदलला असून पाणी पुरवठ्यात आणखी सुधारणा होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

 

हेल्पलाईनवर पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊस
महापालिकेच्यावतीने पाणी पुरवठ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर आज पहिल्याच दिवशी १०० हून अधिक तक्रारी आल्या आहेत.
शहरातील बिबवेवाडी, गोखलेनगर, नगर रोड, कोथरूड, शुक्रवार पेठ, शिवाजीनगर गावठाण, पाषाण, कसबा पेठ, पांडवनगर, हडपसर, वारजे, ससाणेनगर, भांडारकर रोड अशा जवळपास सर्वच भागातून या तक्रारी आल्या आहेत.
यामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा, पाईपलाईन फुटली, पाणी येत नाही असे या तक्रारींचे स्वरूप आहे.
या तक्रारी संबधित विभागातील पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व उपअभियंत्यांना कळविण्यात आल्या असून शक्य तितक्या लवकर त्या सोडविण्यासाठी प्रयत्नही सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (PMC Aniruddha Pawaskar) यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Water Supply | The 60 year old pmc water pipeline in the Prabhat Road area had burst Rain of complaints on the first day on the helpline of the water supply department

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती