Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण; 46,000 च्या जवळपास पोहोचलं Gold, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सराफा बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price Today) दैनंदिन चढ-उतार होताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) किंचित घट होत आहे. तर आज (गुरुवारी) देखील सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणींनंतर सोन्याची किंमत 46,000 रुपये प्रति तोळाझाली आहे. मात्र, चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. यापूर्वी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 46,716 रुपये प्रति तोळा होता. तर चांदीची किंमत (Silver Price Today) प्रति किलो प्रमाणे 65,480 रुपये इतकी होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

सोन्याचा भाव –
दिल्लीतील सराफा बाजारात आज (गुरुवारी) सोन्याचा भाव (Gold Price Today) 264 रुपयांनी कमी झाला आहे. तर दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 46,452 रुपये प्रति तोळा आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,797 डॉलर प्रति औंस आहेत.

चांदीचा भाव –
चांदीच्या दरात (Silver Price Today) आज तेजी पाहायला मिळाली आहे. दिल्लीत आज (गुरुवारी) चांदीची किंमत किरकोळ म्हणजेच 4 रुपयांनी वाढली आहे, तर चांदीचा भाव 65,484 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

दरम्यान, ‘डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये झालेल्या वाढीमुळे सोन्याचा भाव उतरला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) सोन्याचा भाव उतरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे.
अशी माहिती एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली आहे.

Web Title :- Gold Price Today | gold price today gold and silver rates today on 22nd july 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे