Gold Price Today | सोन्याचा भाव पुन्हा वधारला; जाणून घ्या आजचे नवीन दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price) सतत बदलत असतात. आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Price Today) तेजी आली आहे. काल (बुधवारी) सोन्याचा दर 47,760 रुपये होता. त्यात वाढ होऊन आज (गुरूवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,900 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

आज (गुरुवारी) 26 मे 2022 रोजी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोन्याचा दर 47,900 रुपये पर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 62,000 रुपये पर्यंत गेला आहे. दरम्यान, जागतिक बाजारातील चढ-उतारादरम्यान आज भारतीय बाजारात सोन्यात वाढ झाली आहे. सलग तीन ते चार दिवस झाले सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे

 

दरम्यान, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागणार आहे. आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकणार आहात.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,330 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,330 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,330 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 62,000 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Price Today | gold silver price in maharashtra 26 may 2022 mumbai pune nagpur nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा