खुशखबर ! सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार करारावर 15 जानेवारीला स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. याचा परिणाम अंतर्गत बाजारात दिसून आला. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोनं 61 रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदीच्या किंमतीत 602 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली आहे.

8 जानेवारीला सोन्याच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाल्याने सोनं 41,810 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यानंतर सोन्याच्या किंमतीत मागील 6 दिवसांत 1388 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरणं झाली आहे.

सोन्याचे दर –
मंगळवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 40,483 रुपयांवरुन 40,422 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आज सोनं 61 रुपयांनी स्वस्त झाले.

चांदीचे दर –
दिल्ली सराफ बाजारात एक किलोग्रॅम चांदीचे दर 47,685 रुपयांवरुन 47,083 रुपये झाले. आज चांदीच्या दरात 602 रुपयांची घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 1,544 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 17.75 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

फेसबुक पेज लाईक करा –