सोन्या-चांदीच्या जागतिक किंमतीत वाढ, जाणून घ्या ‘वायदे’ बाजारातील दर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : सोन्याच्या वायदा किमतीत गुरुवारी चढ-उतार दिसून आला. एमसीएक्स एक्सचेंजवर गुरुवारी संध्याकाळी 3 एप्रिल रोजी 2020 च्या सोन्याचा वायदा भाव 0.72 टक्क्यांनी म्हणजेच 303 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 42,520 रुपयांवर ट्रेंड करत होता. त्याचबरोबर 5 जून 2020चा सोन्याचा वायदा दर गुरुवारी संध्याकाळी 0.27 टक्क्यांनी म्हणजेच 115 रुपयांनी घसरून 42,721 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होता.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात बुधवारपासून 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे आवश्यक सेवा वगळता सर्व औद्योगिक आणि व्यावसायिक क्रियाकलाप ठप्प झाले आहेत. सोन्याचे बाजारही बंद झाले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्याची लागण होणारी साखळी तोडणे आवश्यक आहे, ज्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल बोलायचे झाल्यास गुरुवारी सायंकाळी सोन्याचा जागतिक बाजारभाव 0.20 टक्क्यांनी म्हणजेच 3.25 डॉलरच्या बढतीसह 1,620.15 डॉलर प्रति औंसवर तसेच चांदीची जागतिक किंमत 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 14.48 डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता. वायदा मार्केटमधील चांदीच्या किंमतींबद्दल बोलयचे झाल्यास गुरुवारी सायंकाळी यात घसरण होताना दिसली. एमसीएक्स वर 5 मे 2020 चा चांदीचा वायदाचा भाव गुरुवारी सायंकाळी 0.89 म्हणजेच 373 रुपयांच्या घसरणीसह 41,333 रुपये प्रतिकिलो राहिला.

You might also like