सलग दुसर्‍या दिवशी सोनं-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. दिल्लीत सराफ बाजारात शुक्रवारी सोने 121 रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे सोन्याचे भाव 10 ग्रॅम मागे 38,564 रुपये झाले आहेत. सुरक्षा आणि कमकुवत आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहून भारतातील सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहेत. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 38,685 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

सोन्याच्या किंमती काल 500 रुपयांनी कमी झाल्या होत्या, त्याबरोबर चांदी देखील 1500 रुपयांनी स्वस्त झाली होती. आज सोन्याच्या भावाबरोबर चांदीच्या भावात देखील घसरण पाहायला मिळाली. आज चांदी 851 रुपयांनी स्वस्त झाली, त्यामुळे चांदी प्रति किलो 46,384 रुपये झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोने शुक्रवारी 1,497.17 डॉलर प्रति औंस झाले तर चांदीच्या दरात कमी येईल चांदी 17.54 रुपये प्रति औंस झाली. जागतिक बाजारातील सोन्या चांदीच्या दरातील घसरणं शुक्रवारी देशातील सराफ बाजारात देखील पहायला मिळाली. भारतील रुपया शुक्रवारी एक डॉलरच्या तुलनेत तसा दुपारनंतर स्थिर होताना दिसला.

सणासुदीला सोन्याचा भावात होत असलेल्या घसरणीमुळे सराफ बाजारात सोने खरेदीत उत्साह दिसून येत आहे. सोने महागल्याने सराफ बाजारात मंदी दिसत होती, कारण लोक सोने खरेदी करत नव्हते. परंतू आता ऐन सणासुदीला सोन्याच्या किंमतीत एकदम घसरण झाल्याने सामान्य लोक खरेदी वर जोर देत आहेत.