4 आठवडयातील सोन्याची ‘उच्चांकी’ तर चांदीमध्ये ‘घसरण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सणासुदीच्या हंगामात, ज्वेलर्स आणि परदेशात दागिन्यांची वाढलेली मागणी यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे भाव 1,150 रुपयांनी वाढून दहा ग्रॅम 39,420 रुपयांवर पोहचले आहेत. अर्थसंकल्पाच्या दुसर्‍या दिवशी 6 जुलैनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. सोन्यावर सीमा शुल्क वाढवल्यामुळे 6 जुलै रोजी भाव 1,300 रुपयांनी वाढले होते.

परदेशातही भाववाढ –

परदेशातही सोन्याचे भाव वाढले असून सोन्याने प्रति औंस 1,500 डॉलरचा आकडा पार केला. सोन्याचे दर आज प्रति औंस 2.50 डॉलरने वाढून 1,509.10 डॉलर झाले.

बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकेतील घटलेल्या रोजगाराच्या आकडेवारीमुळे आर्थिक संकटाची चिंता वाढली आहे आणि त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भांडवल बाजाराऐवजी सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळले.

चांदीच्या भावात अंशतः घसरण –

सोन्याऐवजी चांदीचा भाव आज 50 रुपयांनी घसरून 46,450 रुपये प्रति किलो झाला. चांदीचा वायदा 240 रुपयांनी घसरून 45,401 रुपये प्रतिकिलोवर आला. नाणे खरेदी व विक्री अनुक्रमे 920 आणि 930 रुपये प्रति युनिटवर कायम आहे.

visit : Policenama.com