खुशखबर ! सलग तिसर्‍या दिवशी सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण आणि स्थानिक बाजारात मागणी घसरल्याने सोन्याच्या किंमती सलग तिसर्‍या दिवशी उतरल्या आहेत. राजधानी दिल्लीत गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती 270 रुपयांनी खाली आल्या आहेत. त्याचबरोबर चांदीची किंमत 380 रुपयांनी घसरून 47,310 रुपये प्रतिकिलो झाली आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किंमती दहा ग्रॅमच्या 635 रुपयांनी घसरून 38,454 रुपयांवर आल्या आहेत.

सलग तिसर्‍या दिवशी सोने स्वस्त –

दिल्लीतील 99.9 शुद्ध शुद्ध सोन्याची किंमत दहा ग्रॅम 270 रुपयांनी घसरून 38,454 रुपये झाली.

चांदीचे नवीन दर-

मागणी घटल्याने चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. दिल्लीत गुरुवारी एक किलो चांदीची किंमत गुरुवारी 47,690 रुपयांवरुन 47,310 रुपये प्रतिकिलोवर आली.

या कारणामुळे भावात घट –

तज्ज्ञांच्या मते, पितृपक्षामुळे सोन्याची मागणी झपाट्याने कमी झाल्याचे चित्र आहे. तसेच किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचा कलही सोन्यापासून कमी झाला आहे. म्हणूनच सराफा बाजारात सोन्याच्या किंमती खाली येत आहेत.

Visit – policenama.com 

You might also like