Gold Silver Price Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले, चांदीही महागली; जाणुन घ्या लेटेस्ट दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | मागील काही दिवसापासुन सोने आणि चांदीच्या दरात (Gold and Silver Price Today) किरकोळ प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासुन सोन्याच्या भावात घसरण होत आहे. मात्र आता सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली दिसुन येत आहे. सोन्याचे दर वधारल्यामुळे पुन्हा आकडा 47 हजाराच्या वर गेला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज (मंगळवारी) सोन्याचा भावात 0.25 टक्क्यांची वाढ होऊन 47,171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. अर्थात सोन्याच्या किंमतीत 400 रूपयाची वाढ झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत देखील वाढ झालीय. चांदीच्या दरात 0.35 टक्क्याची वाढ होऊन सध्या भाव 63,801 रुपये स्थिर आहे.

सध्या ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी आनोखी संधी उपलब्ध आहे. दरम्यान, 30 ऑगस्टपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम 2021-22 च्या ६ व्या सीरिजचीविक्री सुरू झालीय. यासाठी इश्यू प्राईज 4,732 रुपये प्रति ग्रॅम आहे. ही स्किम ५ दिवसांसाठी सुरू आहे. या दरम्यान, सोने आणि चांदीचा भाव घरबसल्या केवळ मिस्ड कॉलच्या माध्यमातुन जाणुन घेता येतो. यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या नवीन किमतीबाबत माहिती दिली जाईल.

24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – (Gold price)

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,490 रुपये.

नवी दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,790 रुपये.

कोलकाता –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49, 640 रुपये.

चेन्नईत –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,720 रुपये.

हे देखील वाचा

Maharashtra Police | हातभट्टी तस्कराकडून पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | ‘तु धंदा करतेस, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात, तु त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याच्याकडून पिल्लु काढून घे’; हडपसरमध्ये विनयभंगाचा गुन्हा

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Silver Price Today | gold prices rose by rs 400 on today 31 august 2021 hike in silver price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update