खुशखबर ! सोनं 662 तर चांदी 1431 रूपयांनी झाली ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना लसविषयी चांगली बातमी मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीमध्ये 7 वर्षांतील सर्वांत मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम आज देशांतर्गत बाजारावर दिसून आला. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 662 रुपयांनी खाली आली आहे. त्याचबरोबर, एक किलो चांदीची किंमत 1431 रुपयांनी खाली आली आहे. टक्केवारीच्या बाबतीत 2013 नंतर एका दिवसात सोन्यातील ही सर्वांत मोठी घसरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या संकेतांचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येईल. भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या किमतींमध्ये तीव्र घसरण होऊ शकते. किमती सध्याच्या पातळीपेक्षा 5 ते 8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय रुपयाही मजबूत होत आहे.

नवीन सोन्याचे दर (सोन्याची किंमत, 10 नोव्हेंबर 2020) – मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमती 99.9 टक्के शुद्धतेसह 662 रुपयांनी घसरून 50,338 रुपये प्रतिदहा ग्रॅमवर आल्या. तर, यापूर्वी फक्त एक दिवस आधी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,000 रुपयांवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय सोन्याचे दर घसरून 1881 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

चांदीच्या नवीन किमती (चांदी किंमत, 10 नोव्हेंबर 2020) – मंगळवारी दिल्ली बुलियन बाजारात एक किलो चांदीच्या किमती 1431 रुपयांनी खाली आल्या आहेत. नवीन किंमत 62,217 रुपये प्रतिकिलो आहे. सोमवारी एक किलो चांदी 63,648 रुपयांवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी 24.31 औंस डॉलर प्रति औंसपर्यंत घसरली आहे.

सोन्याच्या किमती कशामुळे घसरल्या – अमेरिकन फार्मा कंपनी फायझर आणि तिची जर्मन भागीदार बायोटेक एसई दावा करतात की, तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत कोरोना विषाणूची लस 90 टक्के प्रभावी आहे. या दोन्ही कंपन्या कोरोना युगातील अशा पहिल्या कंपन्या आहेत, ज्या मोठ्या प्रमाणात लसींचा वापर आणि यशस्वी निकालांचा डेटा सादर करतात. फायझरचे म्हणणे आहे की, या महिन्यात यूएसएफडीएकडून त्याच्या दोन डोसच्या लशीच्या आणीबाणी अधिकृततेसाठी परवानगी घेतली जाईल.

परंतु त्यापूर्वी कंपनी दोन महिन्यांचा सुरक्षितता डेटा गोळा करेल. यावेळी, क्लिनिकल चाचण्या 164 पुष्टी झालेल्या प्रकरणांवर केल्या जातील जेणेकरून लशीच्या कामगिरीचे चांगले मूल्यांकन केले जाऊ शकेल. फायझरने म्हटले आहे की, अभ्यासामध्ये लशीची कार्यक्षमता टक्केवारी बदलू शकते.

OANDA ज्येष्ठ बाजार विश्लेषक एडवर्डचे म्हणणे आहे की, कोरोना लशीची बातमी फार मोठी आहे. त्याचा परिणाम जगभरातील बाजारावर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची सातत्याने खरेदी थांबेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी घट होण्याची शक्यता आहे. तथापि, अजूनही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही.