Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण होताना दिसत आहे. त्याचबरोबर डिसेंबरच्या सुुरुवातीपासून सोन्याच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. आजही सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज (मंगळवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,640 रुपये आहे. तर, चांदीच्या दरात घसरण होऊन चांदी 61,900 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरताना दिसत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी उपलब्ध झाली आहे. मागील वर्षाची तुलना करता यंदा सोन्याचे दर कमी असल्याने सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गतवर्षी सोन्याच्या भावाने 50 हजाराची पातळी ओलांडली होती. यंदा तोच भाव 50 हजाराच्या आत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान. सामान्य सोन्याचे दर (Gold Price) आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. त्याचबरोबर सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49,800 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,640 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,640 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,640 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,640 रुपये

आजचा चांदीचा दर – 61,900 रुपये (प्रति किलो).

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 21 december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट रेट जारी; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

Food Delivery APP-GST | 1 जानेवारीपासून अ‍ॅपवरून जेवण मागवल्यास लागेल टॅक्स! ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस महागणार का? जाणून घ्या

MahaTET Exam Paper Leak Case | ‘टीईटी’चा 2018 चा पेपर देखील… ! पुणे पोलिसांकडून राज्य परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त ‘सुखदेव डेरे’ याच्यासह GA Software चा बंगलुरुचा तत्कालीन संचालक अश्विनकुमारला अटक