MahaTET Exam Paper Leak Case | ‘टीईटी’चा 2018 चा पेपर देखील… ! पुणे पोलिसांकडून राज्य परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त ‘सुखदेव डेरे’ याच्यासह GA Software चा बंगलुरुचा तत्कालीन संचालक अश्विनकुमारला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MahaTET Exam Paper Leak Case | शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण आता माजी आयुक्तांपर्यंत पोहचले असून टीईटीच्या २०१८ च्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर (Pune Cyber Police) विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे (Divisional Commissioner of Secondary and Higher Secondary Aurangabad Board Sukhdev Dere) यालाही अटक केली आहे.

 

त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर (GA software technologies pvt ltd) तत्कालीन संचालक अश्विनकुमार (Ashwini Kumar) यालाही पोलिसांनी बंगलुरु (Bengaluru) येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सायबर पोलीस MahaTET Exam Paper Leak Case चा तपास करत आहेत.

 

सुखदेव डेरे (Sukhdev Dere) हे २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा मंडळाचे आयुक्त (Commissioner of Maharashtra State Council of Examination) होते. २०१८ च्या टीईटी पेपर (MahaTET Exam Paper Leak Case) फोडण्यामध्ये डेरे याचाही हात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

 

डॉ. प्रीतिष दिलीप देशमुख (dr. pritesh dilip deshmukh) याच्या अगोदर
जी ए सॉफ्टवेअरच्या महाराष्ट्राची जबाबदारी अश्विनकुमार याच्यावर होती.
त्याच्याशी संगनमत करुन डेरे व तुकाराम सुपे (Tukaram Supe)
यांनी परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेऊन त्यांना पास केल्याची माहिती समोर आली आहे.

 

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता दुपारी 12 वाजता अधिक माहिती देणार आहे.

 

Web Title :- MahaTET Exam Paper Leak Case | TET’s 2018 paper too …! Pune Cyber Police arrest former Commissioner of State Examination Council Sukhdev Dere and Ashwin Kumar director of GA Software

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा