Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पुणे, मुंबईमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांची घसरण झाली आहे. याशिवाय चांदीचा दरही 700 रुपयांची कमी झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे दिसत आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर आता 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 43,760 रुपयांवर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 44,760 रुपये इतका आहे. याशिवाय चांदीच्या दरात 700 रुपयांची घसरण झाली असून, एक किलो चांदीसाठी आता 65,000 रुपये द्यावे लागणार आहे. मात्र, काल (शुक्रवार) हा दर 65,700 इतका होता. पण त्यामध्ये घसरण झाली आहे.

दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जात असतो. हा दर ठरवत असताना स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून, या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

लग्नसराईत भाव वाढणार?
सोने-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत आहे. तर कधी तेजीही पाहिला मिळत आहे. पण हे दर सध्या घसरत असले तरी लग्नसराईत सोने-चांदीचे भाव आणखी वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.