Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आली. दरम्यान आज सोन्या चांदीच्या किंमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,600 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 67,100 रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आला आहे. दरम्यान, आता सोन्या चांदीच्या किंमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,120 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,120 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,020 रुपये

Web Title : Gold Silver Price Today | know todays rates of Gold Silver

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून