सोनं झालं ‘स्वस्त’, चांदी मात्र ‘महागली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – अर्थसंकल्प सादर होण्याच्या आदल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. रुपया मजबूत झाल्याने शुक्रवारी सराफ बाजारात सोनं 131 रुपयांनी स्वस्त झाले. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करतील. औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीचे दर 89 रुपयांनी वाढले. तर तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरस पसरल्याने गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत.

सोन्याचे दर –
दिल्ली सराफ बाजारात शुक्रवारी सोनं 41,453 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, गुरुवारी सोन्याच्या किंमतीत 400 रुपये तेजी आली, बुधवारी सोन्याचे दर स्थिर होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,577 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम होते तर चांदी 17.86 डॉलर प्रति 28.34 ग्रॅमवर पोहचले.

चांदीचे दर –
सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असली तरी चांदीचे दर वाढ आहेत. औद्योगिक मागणी वाढल्याने चांदी दिल्ली सराफ बाजारात 47,554 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

का होत आहेत सोन्या चांदीच्या दरात बदल –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने तेजी आली. सुरुवातीला रुपया 17 पैशांनी मजबूत होऊन 71.41 डॉलर प्रति डॉलर स्तरावर पोहचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1560 – 1580 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले.

सोन्याचा लिलाव –
मण्णापुरम फायनान्स 3 राज्यात उत्तर प्रदेश, हरियाणा आणि झारखंडच्या विविध शहरात 17 फेब्रुवारीला 10 वाजता लिलाव करणार आहे. सोन्याच्या लिलावासाठी 50 केंद्र निवडले गेले आहेत. हरियाणा, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये कंपन्यांनी हे सेंटर बनवले आहेत. यात रांची, गुरगाव, रोहतास, बोकारो, धनबाद, हजारीबाग, जमशेदपूर, आगरा, गौतम बुद्ध नगर, फरीदाबाद आणि मेवातचा समावेश असेल.

10 हजार रुपये देणे आवश्यक –
सोन्याच्या लिलावामध्ये भाग घेणाऱ्या 10 हजार रुपये सिक्युरिटी मनीच्या रुपात जमा करावे लागतील. जर तुम्ही लिलावामध्ये अपयशी ठरलात तर ते 10 हजार रुपये तुम्हाला परत मिळतील. याशिवाय सोन्याच्या लिलावात भाग घेतल्यानंतर बोली लावणाऱ्यांना पॅन कार्ड आणि आयडी प्रुफ द्यावे लागेल. यानंतर ते बोलीत भाग घेऊ शकतील.