‘या’ कारणामुळं सोन्याच्या दरात वर्षातील सर्वात मोठी ‘घसरण’, चांदी झाली 1148 रूपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोनं 766 रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदी देखील 1148 रुपयांनी स्वस्त झाली. अमेरिका आणि इराणमध्ये असलेला तणाव निवळल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. कॉमेक्सवर सोने 1610 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम वरुन 1546 डॉलर प्रति 28.34 ग्रॅमवर आले. तर अंतर्गत बाजारात वायदा बाजार एमसीएक्सवर देखील गोल्ड वायदा बाजाराच्या किंमती 700 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरल्या. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली.

सोन्याचे दर –
गुरुवारी 99.9 टक्के 24 कॅरेट सोन्याची किंमत 40,400 रुपयांवरुन 40,634 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आज सोन्याच्या किंमतीत 766 रुपयांची घट झाली. बुधवारी सराफ बाजारात 10 ग्रॅम सोने 41,810 रुपयांवर पोहचले होते.

चांदीचे दर –
गुरुवारी चांदी 1148 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे चांदी 48,390 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

का स्वस्त झाले सोनं-चांदी –
HDFC सिक्‍यूरिटीजचे हेड (अ‍ॅडवायझरी-पीसीजी) देवर्श वकील म्हणाले की अमेरिका आणि इराणमधील हल्ल्या प्रतिहल्ल्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढले होते. परंतु आता दोन्ही देशातील तणाव कमी झाला आहे. यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गुंतवत आहेत. भारतीय रुपया देखील मजबूत झाला आहे. आता लग्न सराईत सोन्याच्या किंमतीचे संकेत मिळतील.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/