Gold-Silver Rates Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदी 339 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सराफा बाजारात कालच्या तुलनेत आज बुधवारी सोने-चांदी स्वस्त (Gold-Silver Rates Today) झाले आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 47,837 रुपये झाली आहे, तर एक किलो चांदी 61,477 रुपयात विकली जात आहे.

 

सोन्याचा आजचा दर
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा दर 125 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी होऊन 47,837 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,962 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. (Gold-Silver Rates Today)

 

चांदीचा आजचा दर
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 339 रुपयांच्या घसरणीनंतर 61,477 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदी 61,816 रुपये प्रति किग्रॅमवर बंद झाली होती.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold-Silver Rates Today | gold silver proce 2 february 2022 gold lower by rs 125 silver tanks rs 339 sone chandi che aaj che dar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा