ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED | एक हजार 34 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं (ED) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत (Pravin Raut ) यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. एचडीआयएलची सहाय्यक कंपनी असलेल्या गुरुआशिष कंस्ट्रक्शनमध्ये (Guruashish Construction) प्रविण राऊत हे संचालक आहेत.

प्रविण राऊत हे संजय राऊत यांचे नातेवाईक आहेत. एक हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) पथकाने मंगळवारी प्रविण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करून त्यांना दक्षिण मुंबईतील (South Mumbai) कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. त्यांची अनेक तास चौकशी केली आहे. परंतु, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक केल्याचे समजते.

दरम्यान, यापूर्वी प्रविण राऊत यांचे नाव 2020 साली पीएमसी बँक घोटाळ्यातही आलं होतं. प्रविण राऊत यांच्या पत्नी माधुरी (Madhuri) यांनी 2010 साली शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा (Varsha Raut) यांना 55 लाखांचं व्याजमुक्त कर्ज दिलं होतं. याचा वापर त्यांनी मुंबईतील दादरमध्ये एक फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला होता. दरम्यान, आता गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआय मध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल केल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक (Arrested) केली आहे.

 

Web Title : ED | ed arrests businessman pravin raut connected to shiv sena mp sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’