Nitesh Rane | भाजपचे आमदार नितेश राणेंना पोलिस कोठडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी (Santosh Parab Attack Case) भाजपचे आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे (Bail Application) घेतला आहे. तसेच, ते आता न्यायालयासमोर शरण (Surrender) देखील होत आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. तसेच, नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट देखील केलं आहे. दरम्यान, नितेश राणे (Nitesh Rane) यांना पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

 

दिवसभरात कोर्टात झालेल्या घडामोडीनंतर नितेश राणेंनी (Nitesh Rane) शरणागती पत्करणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) मान ठेऊन मी कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात (Kankavali Civil Court) दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने (State Government) बेकायदेशीरपणे मला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करत असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलंय.

 

शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी सध्या भाजपचे आमदार न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना शरण येण्याचा मार्ग उरला होता. अखेर त्यांनी तो पत्करल्याचं पहायला मिळत आहे.

 

याआधी जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटळला असल्याने ते जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते.
मात्र उच्च न्यायालयासमोरील अर्जही निवेदनासह मागे घेण्यात आला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीश मानशिंदे (Lawyer Satish Manshinde) यांनी दिली.

 

Web Title :- Nitesh Rane | BJP MLA nitesh rane will surrender infront of district session court santosh parab probe

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा