‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगट ने केला विमानतळावरच साखरपुडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियायी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक देणाऱ्या विनेश फोगट च्या आयुष्यात २४ ऑगस्ट हा दिवस खास ठरला एक तर सुवर्णपदकाचा आनंद, याच दिवशी तिचा वाढदिवस आणि याच दिवशी तिने एअर पोर्टवर केलेला साखरपुडा. आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी विनेश भारताची पहिलीच महिला कुस्तीवीर ठरली आहे.

[amazon_link asins=’B06XYN9WPF,B01LF27DB0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’59cda848-aa91-11e8-8478-05ddfd915ffe’]

शनिवारी ती आशियाई स्पर्धेवरून परतली. जकार्ताहून परतल्यानंतर एअरपोर्टवरच साखरपुडा करून तिने हा आनंद दि्वगुणित केला आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टवरच तिने आपला बॉयफ्रेंड सोमवीर राठी सोबत साखरपुडा केला.

जकार्ताहून परतल्यानंतर एअरपोर्टवर गोल्डन गर्ल विनेशचे स्वागत करण्यासाठी तिचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. याच वेळी सोमवीर आणि विनेशने एकमेकांना अंगठी घातली आणि साखरपुड्याचा केकही कापला. विनेशचा होणारा नवरा सोमवीर ग्रीको रोमा कॅटेगरीत रेसलिंग करतो. सोमवीरला नॅशनल मेडल मिळाले आहे. तो सध्या रेल्वेत नोकरी करतो. त्याची पोस्टींग सध्या राजस्थानात आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

गेल्या चार पाच वर्षांपासून या मुहूर्ताची आस

विमानतळावर विनेशने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ला सांगितलं, ‘गेली ४-५ वर्षे वाढदिवसाच्याच दिवशी मला लग्न कराचचे होते . आम्ही दोघे गेली ७-८ वर्षं एकमेकांना ओळखतो. पण गेली काही वर्षे वाढदिवसाच्या आसपास मी कुठलं पदक जिंकले नव्हतं, म्हणून साखरपुडा पुढे ढकलावा लागला होता.’ आपलं संपूर्ण लक्ष सध्या रेसलिंगवरच आहे. कुस्ती व माझ्यात कोणीच येणार नाही, असं ती म्हणाली. विनेश वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि टोकियो ऑलिम्पिकची तयारी करत आहे.