गोल्फर टायगर वुड्स अपघातात जखमी, भरधाव गाडी डिव्हायडरवर आदळून उलटली

लॉस एंजलिस : गोल्फचे प्रसिद्ध खेळाडू टायगर वुड्स मंगळवारी सकाळी लॉस एंजलिसमध्ये एका रस्ता अपघातात जखमी झाले, यानंतर त्यांना जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या ते त्याच हॉस्पीटलमध्ये असून उपचार सुरू आहेत.

वुड्स यांचे सहकारी मार्क स्टाईनबर्ग यांनी म्हटले, अपघातामध्ये वुड्स यांच्या पायाला जखम झाली आहे, त्यांच्यावर अजूनही सर्जरी होत आहे. सोबतच घटनेची गोपनीयता आणि सहकार्यासाठी धन्यवाद दिले.

माहितीनुसार, गोल्फर वुड्स एकटे गाडी चालवत होते. वुड्स यांच्या गाडीचा वेग खुपच जास्त होता, तेव्हा अचानक त्यांची कार मधल्या डिव्हायडरवर आदळली आणि कारवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. वुड्स यांना कारमधून बाहेर काढले तेव्हा ते खुप जखमी आवस्थेत होते. त्यांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या.

जगातील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गोल्फ खेळाडूंमध्ये टायगर वुड्स यांचा समावेश होतो. त्यांनी 15 प्रमुख गोल्फ चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. सध्या सांगणे अवघड आहे की, ते पुढील मास्टर्समध्ये आता खेळू शकतील किंवा नाही. हा किताब त्यांनी शेवटचा 2019 मध्ये जिंकला होता.