बरोजगारांसाठी खुशखबर ! SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 25000 रूपयांपर्यंत पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेकजण आपल्या गावी निघून गेले आहेत. लॉकडाऊनमुळे गावाकडे गेलेल्या कामगारांना तिथेच रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकार करत आहे. यामुळे आता तिथे पैसा खेळू लागल्याने स्टेट बँकेनेही कनिष्ठ व मध्य श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

SBI ने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

SBI मध्ये करण्यात येणारी भरती ही विक्री आणि कॉल सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. कारण क्रेडिट कार्ड व्यवसायाला वाढविण्याचा हेतू यामागे आहे. यामुळे ग्रामीण भागातील आणि कृषी क्षेत्रातील अनुभवी लोकांना नोकरी दिली जाणार आहे. आर्थिक वाढीसाठी बँकेने वेगळा विभाग स्थापन केला आहे. यामध्ये 400 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. SBI कार्डस् काही महिन्यांपूर्वीच शेअर बाजारामध्ये नोंद झाले आहे. यामुळे हा विभाग आता व्यवसाय वाढीकडे लक्ष देणार आहे. केवळ विक्री आणि कॉल सेंटरमध्ये जवळपास 1500 लोकांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचारी ज्युनिअर आणि काही मध्यम श्रेणीतील असणार आहेत. त्यांना 12 ते 25 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.

119 जागांसाठी भरती
SBI ने स्पेशल कॅडर ऑफिसरर्सच्या 119 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवण्यात आले असून, पात्र आणि इच्छूक उमेदवार 13 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. तसेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 जूनपासून सुरु झाली आहे.