21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’मध्ये ‘बिग बाझार’ तुम्ही ऑर्डर केलेल्या गोष्टी करेल ‘घरपोच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : बिग बाझार आता तुमच्या दारात तुम्हाला हव्या असणाऱ्या आवश्यक गोष्टी जसे की अन्न धान्य आणून देणार आहे. देशात असलेल्या लॉकडाऊनमुळे बिग बाझारकडून हा निर्णय घेण्यात आला.

देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु असे असले तरी देशभरात अत्यावश्यक सेवा जसे की किराणाची दुकाने उघडी असणार आहेत. सरकारने सांगितल्यानुसार अशा परिस्थिती देखील सोशल डिस्टंसिंग असणे आवश्यक आहे. देशातील अनेक दुकाने, गर्दीची बाजाराची ठिकाणे आणि मॉल्स बंद करण्यात आले आहेत.

अशा गंभीर परिस्थिती देशातील एक मोठे मार्केट असलेल्या बिग बाझारने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. त्यांनी देशातील अनेक राज्यात होम डिलीवरी (घरपोच) देण्याची घोषणा केली आहे.

यासाठी बिग बाझारने त्या ठिकाणींची यादी आपल्या अधिकृत वेबसाइटवर आणि ट्विटर हँडलवर दिली आहेत जेथे ते होम डिलीवरी देणार आहेत. त्यासाठी त्यांनी फोन नंबर उपलब्ध करुन दिले आहेत ज्यावर तुम्ही किराणा मागवू शकतात. तुम्ही बिग बाझारच्या अधिकृत वेबसाइटवरुन आणखी इतर वस्तु देखील मागवू शकतात त्यानंतर तुमची ऑर्डर तुमच्या घरी डिलीवरी केली जाईल.

यासाठी तुम्ही https://social.bigbazaar.com/ या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

You might also like