खुशखबर : कर्मचाऱ्यांना यंदा ९.७ टक्क्यांनी पगारवाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी वर्गासाठी खुशखबर आहे. ह्यावर्षी कर्मचाऱ्यांना ९.७ टक्क्यांनी पगारवाढ मिळण्याची शक्यता असून सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्याला १५.६ टक्के पगारवाढ मिळेल. महागाई दर कमी झाल्याने अर्थव्यवस्थाही मजबूत असणार आहे तसेच यंदा उत्पादनांना देशांतर्गत मागणी वाढण्याची अपेक्षा कंपन्यांना आहे. याचा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे. एचआर कन्सल्टंन्सी कंपनी इयॉनने केलेल्या वार्षिक सर्व्हेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालातील माहितीनुसार, आशियामध्ये भारत वेतनवाढीच्या दरामध्ये पहिल्या क्रमांकावर राहणार आहे. रशियामध्ये ७.२ टक्के वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण ऑफ्रिकेमध्ये कर्मचाऱ्यांना ६.७ टक्के वेतनवाढ मिळू शकेल. ब्राझीलमध्ये ५.८ टक्के, अमेरिकेमध्ये ३.१ टक्के, ऑस्ट्रेलियामध्ये ३ टक्के आणि ब्रिटनमध्ये २.९ टक्के वेतनवाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

कंझ्यूमर इंटरनेट कंपन्या, व्यावसायिक सेवा, लाईफ सायन्स, कंझ्यूमर प्रॉडक्ट आणि ऑटो क्षेत्रामध्ये दुहेरी अंकांची वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय चांगले प्रदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १.९ पटींनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी १५.६ टक्के वेतनवाढ मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विद्यार्थ्याच्या खिशात कॉपी ऐवजी सापडले ‘हे’ पत्र

अहमदनगर : आ. कांबळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे

Loading...
You might also like