6 कोटी नोकरदारांना मोदी सरकारची मोठी भेट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या
नवी दिल्ली : नोकरदारांसाठी मोठी खुशखबर येणार आहे. पुढील महिन्यापासून पीएफ खात्यात जास्त पैसे येऊ शकतात. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायजेशन (EPFO) कडून कर्मचार्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जुलैच्या अखेरपर्यंत देण्याची घोषणा लवकरच होऊ शकते. या बाबतीत ईपीएफओला (EPFO) कामगार मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. ही प्रक्रीया लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
6 कोटीपेक्षा जास्त कर्मचार्यांना मिळेल फायदा
कामगार मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर पीएफच्या कक्षेत येणार्या देशभरातील सुमारे 6 कोटी कर्मचार्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी असू शकते. ईपीएफओकडून फिस्कल ईयर 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जुलैच्या अखेरपर्यंत दिले जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, व्याजाचे पैसे कर्मचार्यांच्या खात्यात थेट क्रेडिट केले जाऊ शकतात.
मागच्या वर्षी 2019-20 चे व्याज मिळण्यात अनेक ईपीएफओ अकाऊंट होल्डर्सला 10 महिन्यांपर्यंतची मोठी प्रतिक्षा करावी लागली होती. ईपीएफओने फिस्कल ईयर 2020-21 च्यासाठी व्याजदर न बदलता 8.5 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय ईपीएफओने देशभरात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे अकाऊंट होल्डर्सला नॉन रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हान्सचे पैसे काढण्याची परवानगी दिली होती.
DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक
विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या